ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच आता राज्यातील अजून एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
यापूर्वी कालच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, काँग्रेस नेते हसन मुश्रीफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.