मुंबई
महिंद्रा समूहाच्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने बांधकाम उपकरण व्यवसायाअंतर्गत नवीन BSIV सहित मोटर ग्रेडर महिंद्रा रोड मास्टर जी 9075 आणि जी 9595 आणि बॅकहो लोडर महिंद्रा अर्थ मास्टर एसएक्स व्हीएक्स यांच्याजोडीला त्यांची BSIVसह असलेली बांधकाम उपकरणे सादर केली आहेत.
यावेळी बोलताना महिंद्रा ट्रक, बस आणि बांधकाम उपकरण व्यवसाय प्रमुख जलाज गुप्ता म्हणाले, “बांधकाम उपकरण व्यवसायासाठी महिंद्रा अर्थ मास्टर बॅकहो लोडर्सची नवीन BSIV मालिका सादर करत आहोत. ग्राहकांना उच्च प्रतीची विश्वासार्हता पुरवत आणि तुलनेने कमी खर्चात सर्वोत्तम उत्पादन सुविधा देऊन त्यांची उत्पादन क्षमता आणि फायदा यांच्यात वाढ करणे हे आमचे ध्येय आहे.’’ गुप्ता पुढे म्हणाले, “बांधकाम उपकरण व्यवसायक्षेत्रासाठी असलेल्या नवीन वायू उत्सर्जन नियमांना अनुसरून महिंद्रा रोड मास्टर मोटार ग्रेडर्ससाठीही आमची BSIV सहित असलेली मालिका सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. या संपूर्ण एमसीई BSIV मालिकेत मजबूत आयमॅक्स सुविधा असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांची कार्ये अधिक चांगली करता येतील आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संभाव्य, लक्षणसूचक आणि अचूक वेगवान व्यवस्थापन करता येईल. महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्वीपमेंट (एमसीई) ही एक सच्ची भारतीय बांधकाम उपकरण उत्पादक कंपनी आहे, जी वर्ष 2011 पासून भारतीय ग्राहकांच्या गरजांना अनुरूप अशी खास यंत्रे आरेखित आणि उत्पादित करते आहे.