प्रा. मनीषा नेसरकर : जायंट्स मेनकडून पाच महिलांचा सन्मान
प्रतिनिधी /बेळगाव
महिलांचा सन्मान कशा पद्धतीने करावा हे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवले, असे मत प्रा मनिषा नेसरकर यांनी व्यक्त केले. दरवषीप्रमाणे यावषीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जायंट्स मेनच्या वतीने सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार, प्रा. मनीषा नेसरकर, पोलीस उपनिरीक्षक राजश्री कदम, उद्योजिका रत्ना होसमठ, स्वतः काबाडकष्ट करून आपल्या मुलींना शिक्षण देणाऱया कुसुम नाईक या पाच महिलांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. अनुक्रमे विनोद गायकवाड, अनंत जांगळे, पी आर कदम, मोहन कारेकर आणि संजय पाटील यांनी हा सत्कार केला.
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात जायंट्सच्या प्रार्थनेने झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत विभागीय संचालक मदन बामणे आणि प्रास्ताविक फेडरेशन सचिव अनंत लाड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सुनिल मुतगेकर आणि सचिव विजय बनसुर उपस्थित होते. सर्वच सत्कारमूर्तीनी सत्काराप्रति कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप अध्यक्ष संजय पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेडरेशन संचालक शिवराज पाटील तर आभार विजय बनसुर यांनी मानले.