प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन काळात पत्रकारांनी कोरोनाविरुद्ध प्रंटलाईन वॉरियर्सची भूमिका बजावली आहे. पत्रकार विकास अकादमीच्या माध्यमातून गरजू पत्रकारांना किट्सचे वितरण करण्यात आले आहे. त्याची दखल महिला आघाडीने घेतली आणि किट्स वितरण करण्यासाठी 10 रेशन किट अकादमीला देण्यात आले.
महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी पत्रकार विकास अकादमीचे उपसचिव प्रकाश बिळगोजी यांच्याकडे दहा किट सुपूर्द केले आहेत. यावेळी सुहास किल्लेकर, अजित कोकणे आदी उपस्थित होते.