प्रतिनिधी / पणजी
गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता प्रचारला वेग आला असून महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना एस नाईक यांनी गोवा प्रभारी डॉ सीमा फर्नांडिस आणि त्यांच्या महिला गट अध्यक्षांसह मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वाराला भेट देत लोकांच्या कल्याणासाठी तसेच काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना बीना नाईक म्हणाल्या की, गेल्या कोरोना लाटेत भाजप सरकारच्या निष्काळजीपणामुळे 3,500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. “भाजप सरकार या रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यात अपयशी ठरले. तसेच वाढती कोविड प्रकरणे पाहता, महिला काँग्रेसने फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण, फोंडा येथील साफा मस्जिद, जुने गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च आणि बेती येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभेला भेट दिली.
महिला काँग्रेसने यापूर्वी निवेदनाद्वारे आणि पत्रकार परिषदांद्वारे महामारीच्या तीव्रतेबद्दल चेतावणी दिली होती परंतु भाजप सरकार मुके आणि बहिरे झाले आहे असे बीना नाईक म्हणाल्या. तसेच या सरकारकडे दूरदृष्टी नाही आणि म्हणूनच आम्ही आमच्या सर्व गोव्यातील बंधू-भगिनींची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रार्थना स्थळांना भेट दिली..” असे बीना नाईक म्हणाल्या.आम्ही प्रार्थना केली की काँग्रेस पक्ष सत्तेवर आला पाहिजे आणि भाजपच्या चुकीच्या शासनात लोकांना ज्या दुःखाचा सामना करावा लागत आहे त्यापासून मुक्त व्हावे. असे त्यावेळी नाईक म्हणाल्या.