मँचेस्टर
2023 मध्ये होणाऱया महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय विश्व फुटबॉल संघटना फिफा येत्या 25 जून रोजी घेणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदासाठी तीन अर्ज आले असून त्यापैकी एकाची निवड केली जाणार आहे.
फिफा कौन्सिलची बैठक 25 जून रोजी होणार असून तीन देशांनी या स्पर्धेच्या यजमानपदाची मागणी केली आहे. त्यात कोलंबिया, जपान व न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. ब्राझीलने या शर्यतीतून सोमवारी माघार घेतली आहे. कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर हमी रक्कम देणे शक्य नसल्याने ब्राझीलने माघारीचा निर्णय घेतला. 2019 मध्ये ही स्पर्धा फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती आणि टीव्हीवर स्पर्धा पाहणाऱयांच्या बाबतीत या स्पर्धेने नवे विक्रम प्रस्थापित केले होते.