राजीव गांधी कला मंदिरच्या सहावी अ.गोवा महिला नाटय़ स्पर्धा स्व. किशोरीताई हळदणकर स्मृतीप्रित्यर्थ
प्रतिनिधी / फोंडा
राजीव गांधी कला मंदिरतर्फे आयोजित स्व. किशोरीताई हळदणकर स्मृतीप्रित्यर्थ सहावी अखिल गोवा महिला संगीत नाटय़स्पर्धेचे प्रथम पारितोषिक होंडा-सत्तरी येथील स्वरसत्तरी संस्थेच्या सं. मत्सगंधा यांना प्राप्त झाले. काल बुधवारी कला मंदिर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
यावेळी कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी, कला मंदिरचे उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर, संचालक किरण नाईक, गिरीष वेळगेकर, जुझे गोएस उपस्थित होते. स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक केरी फोंडा येथील विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाच्या सं. शारदा यांना तर मांद्रे येथील अभिनव कला थिएटरच्या सं. ययाती व देवयानी यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. तसेच देवी माऊली कला मेणकुरे डिचोलीच्या सं. गुरूदक्षिणा, गुरूकृपा सांस्कृतिक संस्था म्हार्दोळ सं. सौभद्र, निषद पणजी सं. संशयकल्लोळ यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके देण्यात आली.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :
- उत्कृष्ट दिग्दर्शन-प्रथम शिवनाथ नाईक (मत्सगंधा), द्वितीय कमलाक्ष खेडेकर (शारदा) , तृतीय प्रशांत मांद्रेकर( ययाती आणि देवयानी)
- उत्कृष्ट अभिनय : पुरूष भूमिकेसाठी प्रथम कृतिका जाण (भुजंगराव-शारदा),द्वितीय मृण्मयी मांद्रेकर (ययाती-ययाती आणि देवयानी),तृतीय डॉ. वेदिका वाळके (फाल्गुनीराव- संशयकल्लोळ)
- उत्कृष्ट अभिनय स्री : भूमिकेसाठी प्रथम-संपदा गोपाळ गावस (अंबा-मत्सगंधा),द्वितीय धनश्ा़खाr बाबुसो नाईक(सीता अयोध्येचा ध्वजदंड),तृतीय प्राजक्ता लोटलीकर (कृतीका-संशयकल्लोळ)
- उत्कृष्ट अभिनय पुरूष भूमिकेसाठी प्रशस्तीपत्र- सौ. उत्कृर्षा गावस (भीष्म-मत्सगंधा),सुराल घाटवळ(रावण-राम जन्मला ग सखे),वेदांगी पार्सेकर(विदुषक-ययाती आणि देवयानी), अंजली अनंत नाईक (घटोत्कच-ब्रह्मतेज),सौम्या शिरोडकर(शंतनू-मत्सगंधा) यांना प्रशस्तीपत्र प्रात्प झाले.
- उत्कृष्ट अभिनयः स्त्री भूमिकेसाठी प्रशस्तीपत्र-सौ. नियती दिपक गावस (सत्यवती -सं. मत्सगंधा) प्रज्ञा तांडे (रूक्मिणी-सौभद्र) यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
- उत्कृष्ट नेपथ्यः प्रथम नितीन नाईक (गुरूदक्षिणा), द्वितीय प्रेमानंद मांद्रेकर(ययती आणि देवयानी).
- उत्कृष्ट प्रकाशयोजनाः प्रथम उदय धूपकर (मत्सगंधा), द्वितीय-नितेश नाईक (गुरूदक्षिणा).
- उत्कृष्ट ध्वनीसंकलनः प्रथम-दिपक गांवस (मत्सगंधा) , द्वितीय-निलेश नाईक (गुरूदक्षिणा)
- उत्कृष्ट रंगभूषाः प्रथम-जितेंद्र परब (सौभद्र), द्वितीय-निळकंठ खलप (गुरूदक्षिणा).
- उत्कृष्ट वेशभूषाः प्रथम प्रेरणा देसाई (शारदा), द्वितीय-दत्ताराम सोपटे (ययाती आणि देवयानी)
- उत्कृष्ट संवादिनीवादकः प्रथम-महेश गावस (मत्सगंधा), द्वितीय-प्रदीप शिलकर (शारदा)
- उत्कृष्ट तबलावादकः प्रथम-शैलेश शिरोडकर (मत्सगंधा), द्वितीय-मिलिंद परब (शारदा).
- उत्कृष्ट गायनः स्त्री भूमिका प्रथम-सिद्धि पार्सेकर (शर्मिष्ठा- ंसं. ययाती आणि देवयानी), द्वितीय-चिन्मयी कामत (सुभद्रा-सं. सौभद्र)
- उत्कृष्ट गायन स्त्री भूमिकेसाठी प्रशस्तीपत्र पृथा गावकर (शारदा-सं. शारदा)
- उत्कृष्ट गायनः पुरूष भूमिका प्रथम-लता गावस (पराशर -सं.मत्सगंधा), द्वितीय-भक्ती संजय धुपकर (कच -ययाती आणि देवयानी)
- उत्कृष्ट गायन पुरूष भूमिकेसाठी प्रशस्तीपत्र श्रृती बोरकर (कोंदड-शारदा), द्वितीय गायित्री पाटील (आश्वी मराठे-संशयकल्लोळ).
उत्कृष्ट बालकलाकारः प्रथम-कु. साईली नाईक (कृष्ण-सं.गुरूदक्षिणा),द्वितीय-कु. अनुष्का जाण (मंदाकिनी-सं.शारदा), निहीरा नाईक (र्कौशिक-सं. गुरूदक्षिणा)यांना प्राप्त झाली. स्पर्धेचे परीक्षण मंगला जांभळे, प्रचला आमोणकर व निवेदिता चंद्रोजी यांनी केले. विजेत्या पथकांना तसेच वैयक्तिक कामगिरीसाठी कलाकारांना प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिके बक्षिस वितरण सोहळय़ात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कला मंदिरचे उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी दिली.