रशियन नागरिकाला अटक : पेडणे पोलिसांची कारवाइ
पेडणे / प्रतिनिधी
पेडणे पोलिसांनी सावंतवाडा मांदे येथे बुधवारी संध्याकाळी अमली प्रदार्थ व्यवसायात असलेल्या एका रशियन नागरिकाला अमली प्रदार्थासह ताब्यात घेत त्याच्याकडून चरस व गांजा हे अमली प्रदार्थ जप्त केले.या अमली प्रदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चरस ची किंमत 25 हजार रुपये तर गांजाची किंमत एक लाख सहा हजार रुपये असून एकूण या अमली प्रदार्थाची किंमत ही एक लाख 31 हजार होते. हे अमली प्रदार्थ रशियन नागरिकत्व असलेले ओलेग नाझारोव वय 37 वर्षे यांच्याकडे सापडले. या विदेशी नागरिकाला अमली प्रदार्थ बाळगल्या ताब्यात घेत या प्रकरणी गुन्हा नोंद करत अटक केली.
पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांना खास सूञा?कडून माहिती मिळाली होती कि सावंतवाडा मांदे येथे एक विदेशी पर्यटक हे राहत असून ते अमली प्रदार्थ व्यवसायात आहेत.
निरीक्षक जिवाबा दळवी यांनी खास पथक तयार करुन या पथकात स्वतः आपण , पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, पोलिस उपनिरीक्षक हरिष वायंगणकर, पोलिस का?न्स्ट?बल विनोद नाईक, रवी मालोजी व अनिशकुमार पोके यांनी बुधवारी संध्याकाळी सापळा लवून धाड टाकली व रशियन नागरिकाला ताब्यात घेतले.
मधलावाडा हरमल येथे पेडणे पोलिसांनी बेकायदेशीर गांजा लागवड केलेले अमली प्रदार्थ ताब्यात घेत गांजा शेती केली उध्वस्त , 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचा गांजा केला जप्त