ओटवणे /प्रतिनिधी-
बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या अनुराग संजय सावळ याचा माजगाव वासियांच्यावतीने गौरव करण्यात आला. शिवसेनेचे माजगाव विभाग युवा सेना अध्यक्ष अतुल कासार आणि पन्हाळा शिवसेना उपअधिकारी तथा माळवाडी ग्रामपंचायत उपसरपंच अमर भोमकर यांच्याहस्ते अनुराग सावळ याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजगाव सरपंच दिनेश सावंत, माजी सरपंच आबा सावंत, शिवसेना माजगाव विभाग प्रमुख संजय माजगावकर, माजगाव शिवसेना शाखा प्रमुख रुपेश नाटेकर, नरहर शिरोडकर, सौरभ पडते, राजेश हरमलकर, रामचंद्र कुबल आदी उपस्थित होते.