ऑनलाईन टीम / कोटा :
माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारला राजस्थानातील सवाई माधोपूर येथे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात अझरुद्दीन थोडक्यात वाचले आहेत. लालसोट कोटा मेगा हायवेवरील सुरवाल पोलिस ठाण्याजवळ हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अझरुद्दीन कुटुंबासह रणथंभोर येथे जात होते. यावेळी कारचा टायर निघाल्याने कार वरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या ढाब्यात घुसली. यामध्ये अझरुद्दीन यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली. त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अझरुद्दीनला दुसर्या वाहनाने हॉटेलमध्ये नेले आहे.
दरम्यान, या अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.