वृत्तसंस्था / बेलग्रेड
क्रोएशियाचा माजी टेनिसपटू गोरान इव्हानिसेव्हिकला कोरोनाची बाधा झाली आहे. सर्बियामध्ये नुकत्याच झालेल्या ऍड्रिया टूर प्रदर्शनीय टेनिस मालिकेत माजी विम्बल्डन विजेता तसेच टॉप सिडेड ज्योकोव्हिचचा प्रशिक्षक इव्हानिसेव्हिकला वैद्यकीय तपासणीनंतर कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
सर्बिया आणि क्रोएशिया येथे झालेल्या ऍड्रिया टूर प्रदर्शनीय टेनिस मालिकेत सहभागी झालेल्या सर्बियाच्या टॉप सिडेड ज्योकोव्हिचसह अन्य तीन टेनिसपटूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह, सर्बियाचे कोरीक आणि ट्रोस्की यांचा समावेश आहे. इव्हानिसेव्हिकने 2001 साली विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. आपल्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींना कळावे म्हणून इव्हानिसेव्हिकने स्वतःच्या ट्विटरवर कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.