वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमधील प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील आघाडीच्या मँचेस्टर सिटी क्लबचे माजी फुटबॉलपटू ग्लीन पार्डेई यांचे वयाच्या 73 व्या वर्षी आकस्मित निधन झाल्याचे माहिती क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
ग्लेन पार्डेई यांनी 1962 साली वयाच्या 15 वर्षे आणि 314 दिवस झाले असताना मँचेस्टर सिटी क्लबमध्ये पदार्पण केले होते. या क्लबमध्ये सहभागी होणारे पार्डेई हे पहिले सर्वात युवा फुटबॉलपटू आहेत. 1968 साली मँचेस्टर सिटी क्लबने प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धा तर 1969 साली एफए चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. या दोन्ही स्पर्धांमध्ये पार्डेई& यांची कामगिरी दर्जेदार झाली होती. 1976 साली पार्डेई& यांनी फुटबॉल क्षेत्रातून निवृत्ती पत्करली. त्यांनी 380 सामन्यात मँचेस्टर सिटीचे प्रतिनिधीत्व करताना 22 गोल नोंदविले. मँचेस्टर सिटी क्लबतर्फे पार्डेई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.