पर्वरीत घेतला अंतिम श्वास : सोमवारी पणजीत होणार अंत्यसंस्कार
प्रतिनिधी /पर्वरी, पणजी
देशाचे माजी लष्कर प्रमुख आणि पंजाबचे भूतपूर्व राज्यपाल आणि गोव्याचे सुपुत्र जनरल सुनित रॉड्रिग्ज यांचे काल शुक्रवारी दुपारी येथील डिफेन्स कॉलनीतील राहत्या घरात वयाच्या 88 वषी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवार 7 रोजी सकाळी सांत ईनेज चर्चच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
जनरल सुनित रॉड्रिग्ज यांचा जन्म 1933 मध्ये मुंबईत झाला होता. त्यांना भारत सरकारतर्फे परम विशि÷ सेवा पदक देऊन गौरविण्यात आले होते.
तब्बल 41 वर्षे लष्करातून केली देशसेवा
जनरल सुनित रॉड्रिग्ज यांनी 1952 साली भारतीय लष्करामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय लष्करामध्ये 41 वर्षे विविध पदांवर लष्करसेवा बजावून 30 जून 1993 साली लष्कर प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. लष्करात एक विचारवंत आणि रणनीतीकार म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांनी देशासाठी अत्यंत समर्पणाने काम केले आहे. 1990 ते 93 दरम्यान ते भारतीय सैन्याचे प्रमुख होते. तसेच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावर दोन वेळा काम केले आहे.
राज्यपालपदाची कारकीर्दही स्पृहणीय
ते 2004 ते 2010 पर्यंत पंजाबचे राज्यपाल होते आणि केद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सहा वर्षे ते इंटरनॅशनल सेंटर ऑफ गोव्याचे संचालक होते.
निवृत्तीनंतर सामाजकार्य, साहित्यात घेतला रस
सेवा निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला सामाजिक आणि साहित्यिक कार्यात गुंतून घेतले होते. अनेक वेळा ते सामाजिक विषयावरच्या चर्चांमध्ये भाग घेत होते. मुलांना त्यांची क्षमता साध्य करण्यासाठी शिक्षण आणि सक्षम बनवण्यासाठी त्यांनी खूप रस घेतला होता. ते सात वर्षे गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यवस्थापकीय समितीवर होते. त्यांच्या अमुल्य योगदानाबद्दल आणि सेवेसाठी भारत देश आणि भारतीय सैन्य नेहमीच ऋणी राहील.
राज्यपालांकडून श्रद्धांजली
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी जनरल सुनित रॉड्रिग्ज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. गोव्याचे सुपूत्र आणि अत्यंत उच्च लष्करी अधिकारी, तसेच त्यांनी भारतीय सैन्याच्या बळकटीकरणात मोठे योगदान दिले. पंजाबचे राज्यपाल आणि चंडीगढचे प्रशासक म्हणून त्यांच्या कार्यकाळात ते एक उल्लेखनीय प्रशासक होते. त्यांनी देशासाठी केलेली अतुलनीय सेवा कधीही विसरता येणार नाही, असे सांगून राज्यपालांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती सांत्वन व्यक्त केले आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.
दिगंबर कामतांची श्रद्धांजली
भारताचे माजी लष्कर प्रमुख व पंजाबचे माजी राज्यपाल जनरल सुनित फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांना अभिवादन. त्यांनी प्रति÷ा, कार्यतत्परता व समर्पक भावनेने राष्ट्रसेवा केली. ते एक विचारवंत व रणनीतिकार होते. त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती माझ्या संवेदना. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.