पालिकेचा शॉटसर्किटचा दावा, मात्र नेमके कारण अस्पष्ट, सायंकाळी उशिरा आग नियंत्रणात, मडगावसह विविध ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या सहा बंबांचा वापर, 72 हजार लिटर पाणी खर्ची
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेच्या सोनसडा कचरा यार्डमधील बायोरेमेडिएशनसाठी पडून असलेल्या कचऱयाच्या ढिगाला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. यार्डमधून जाणाऱया केव्ही 33 या उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळे सदर आग लागल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे सदर आगीमागे घातपाताची शक्मयता वर्तविण्यात येत असून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. शुक्रवारी सायंकाळी 6 पर्यंत पाण्याचे फवारे व मातीचे भराव टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दल तसेच पालिकेला यश आले असले, तरी रात्री उशिरापर्यंत अधूनमधून धुमसणारी आग विझविण्याचे काम सुरूच होते.
दुपारी 1 च्या सुमारास सदर आग लागण्याची घटना घडल्यानंतर लगेच पालिकेच्या तांत्रिक आणि सॅनिटरी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने सोनसडय़ावर धाव घेतली. मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी अग्निशामक दल तसेच वीज खात्याला यासंदर्भात सूचित केले. अग्निशामक दलाने मडगावातील तीन बंबांसह धाव घेऊन आग विझविण्याचे काम हाती घेतले. सदर आगीची झळ पोहोचून बेलिंगसाठीचा प्लास्टिक कचरा तसेच तेथेच मोठय़ा प्रमाणात पडून असलेल्या थर्माकोलने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. आगीची तीव्रता वाढल्याने फोंडा, कुडचडे आणि कुंकळ्ळी अग्निशामक दलाचे अतिरिक्त बंब मागविण्यात आले. सुमारे 6 बंब वापरून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सायंकाळपर्यंत आगीवर पाण्याचे फवारे मारण्याचे काम जारीच होते. सायंकाळी 6 पर्यंत 72 हजार लिटर पाणी आग विझविण्यासाठी खर्ची घालण्यात आले होते.
शॉर्टसर्किटमुळे आगीचा पालिकेचा दावा
सोनसडा यार्डात विजेच्या शॉटसर्किटमुळे सदर आग लागल्याचा पालिकेचा दावा आहे. मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी पालिका संचालक, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसेच पोलीस व वीज खात्याला या आगीसंदर्भात माहिती देण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहारात आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. एकदा आग लागल्यानंतर कचऱयातील मिथेनमुळे आग धुमसत राहण्याची शक्यता असते, असे आग विझविण्याच्या कामात सहभागी झालेले अग्निशामक दलाचे अधिकारी हर्क्युलान गील सोझा यांनी सांगितले.
आग आधी नेमकी कुठे लागली ?
कचरा यार्डात बायोमिथेनेशनसाठी पडून असलेल्या कचऱयाला आग प्रथम लागल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. वरील कचऱयाला आग लागली असली, तरी पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या बेलिंग शेडजवळ आधी आग लागल्याचा दावा करण्यात येत आहे. येथील बेलिंगसाठी ठेवलेला प्लास्टिक कचरा व बेलिंग शेड या आगीत जळून गेली.
उपाययोजना यशस्वी : मुख्याधिकारी
बायोरेमेडिएशन प्रक्रिया करून ताडपत्री घालून झाकून ठेवलेल्या आरडीएफ कचऱयाला आग लागणार नाही यासाठी प्रयत्न केल्याने ते फलदायी ठरले. दुसऱया बाजूने मनोविकास शाळेच्या बाजूने आग फैलावणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात आले. मातीचे भराव टाकून आग फैलावू नये याकरिता उपाययोजना करण्यात आली असता त्यात यश आल्याची माहिती मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
आसमंतात काळय़ा धुराचे लोट
आगीच्या धुराचे मोठे काळेकुट्ट लोळ आसमंतात आढळून आले. सदर लोळ प्लास्टिक कचरा व खास करून मोठय़ा प्रमाणात थर्माकोल साहित्याने पेट घेतल्याने उठल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदर कचऱयाबरोबर यार्डाच्या रस्त्यांशेजारील सुकलेली झाडे, पालापाचोळा व गवताने पेट घेतल्याने यार्डामध्ये जाणाऱया वाहनांना अडथळे आले.
वीजवाहिनी हटविण्याकडे दुर्लक्ष
33 केव्ही वीजवाहिनी यार्डमधील कचऱयाच्या एकदम जवळून जात असल्याने ती हटविण्यासाठी वा दुसऱया बाजूने नेण्यासाठी पालिकेने वेळोवेळी वीज खात्याशी पत्रव्यवहार केला असला, तरी ती हलविली गेली नसल्याने आगीच्या घटना घडत असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. सदर वाहिनी शुक्रवारच्या आगीत वितळून खाली पडल्याचे दिसून आलेले आहे.
आगीच्या यापूर्वीही मोठय़ा घटना
2019 मध्ये यार्डातील कचऱयाचे मोजमाप घेण्यासाठी एका खासगी कंपनीचे काम सुरू होते तेव्हा एका कर्मचाऱयाने आपल्या हातातील लोखंडी मोजमाप यंत्र वर उंचावले असता त्याचा वीजवाहिनीशी संपर्क येऊन त्याला विजेचा धक्का लागून तो जखमी झाला होता. त्यावेळी ठिणग्या पडून कचऱयाला अशीच आग लागली होती. त्यापूर्वी सोनसडय़ावर कचऱयातील मिथेन गॅसमुळे आग लागली असता आगीवर नियंत्रण मिळविण्यास पाच दिवस लागले होते व लाखो लिटर पाणी आणि शेकडो ट्रक माती आग विझविण्यासाठी खर्ची घालण्यात आली होती.
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी फर्नांडिस, पालिका अभियंता मनोज आर्सेकर, साहाय्यक अभियंता विशांत नाईक, कनि÷ अभियंता सज्जन गावकर, राजेश देसाई, सॅनिटरी व अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्या पथकासह आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच ती आणखी पसरू नये यासाठी कार्यरत होते. वीज खात्याला खास वीजबत्तीची सोय करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱयांनी दिले होते. मुख्याधिकाऱयांनी फातोर्डा पोलिसांशी पत्रव्यवहार करून आगीच्या घटनेसंदर्भात तक्रार नोंद करण्यात सूचित केलेले आहे.
आमचे सरकार आल्यावर कायमचा तोडगा काढू ः चर्चिल सोनसडय़ाच्या बाजूने जात असताना सदर आगीच्या धुराचे लोळ पाहून बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी घटनास्थळी थांबून पाहणी केली. सोनसडय़ाला आग लागण्याचे प्रकार वरचेवर घडत असतात. यावर कायमचा तोडगा काढण्याची गरज आहे. 10 मार्चपर्यंत थांबा. आमचे सरकार आल्यावर सोनसडाप्रश्नी कायमचा तोडगा काढू, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दरम्यान, दरवेळी सोनसडय़ावर आग लागल्यानंतर मायणा आणि कुडतरीच्या लोकांना धुराचे प्रदूषण सोसावे लागते. त्यामुळे येथील जनतेने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संबधितांकडे आपली बाजू मांडण्याची गरज कुडतरी पंचायतीच्या एका लोकप्रतिनिधीने व्यक्त केली.