प्रतिनिधी /बेळगाव
सेंट्रल हायस्कूलच्या 1976 च्या बॅचच्यावतीने तत्कालीन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. हॉटेल पंचामृत येथे झालेल्या या कार्यक्रमात एम. व्ही. पाटील, एन. एस. मुरगोड, एम. एन. बेळगावकर, एस. आर. सप्रे या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
45 वर्षांनंतर विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकांनी आपले मन मोकळे केले. यावेळी शिक्षिका एन. एस. मुरगोड म्हणाल्या, सध्या मी 82 वर्षांची असून व्यवस्थित चालताही येत नाही. परंतु या सर्व विद्यार्थ्यांना पाहून सेंट्रल हायस्कूलमध्ये शिकवत असल्याचा भासत होत आहे. या कार्यक्रमामुळे एक नवा आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. एम. व्ही. पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे आभार मानले. एम. एन. बेळगावकर व एस. आर. सपे यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.
किरण गावडे यांनी स्वागत केले. दिनेश बेळगावकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नंदकुमार मोरे तर विलास देसाई यांनी आभार मानले. यावेळी रोहन कंग्राळकर, मोहन पुरी, मनोहर मुतगेकर, दीपक अनसुरकर, किरण पाटील, दीपक गोडसे, ज्ञानेश्वर बिर्जे, माधव मुनगुतकर, गजानन देसूरकर, चिंतामणी किल्लेकर, कृष्णा आपटेकर, सिद्राय कदम, उदय लोहार, अनिल गौंडाडकर उपस्थित होते.