नवी दिल्ली
सध्या देशातील महनीय व्यक्तींनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि तामिळनाडूतील ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांची चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल आता येऊ लागले असून संबंधितांनी स्वतःला क्वारंटाईनही करून घेतले आहे.