पुलाची शिरोली / वार्ताहर
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कामाची पहाणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी शिरोली ग्रामपंचायतीस भेट दिली. सदर अभियानात ग्रामपंचायतचे काम उत्कृष्ट असून राज्यात प्रथम येईल या साठी आवश्यक कामे पूर्ण करावीत असे त्यांनी सांगितले, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रस्ताव सादर करण्याबरोबरच गाव तलाव सुशोभीकरण व सर्व कुटुंबाला डस्टबिन वाटपाबाबत त्यांनी सरपंच शशिकांत खवरे यांचे अभिनंदन केले.
गावासाठी आवश्यक विकास कामाचे प्रस्ताव सादर करणेबाबत त्यांनी सूचना केल्या, यावेळी लोकनियुक्तसरपंच शशिकांत खवरे, हातकणंगले गट विकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, उपसरपंच सुरेश यादव, विस्तार अधिकारी. एस जे पवार, ग्रामविकास अधिकारी आर. सी .पाटील, कुंभोज ग्राम विकास अधिकारी ए एस कठारे कृषी सहायक प्रमोद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाबासो कांबळे, संदीप कांबळे, अर्जुन चौगले, अर्जुन चौगुले, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या वेळी अभियानाची शपथ उपस्थितांनी घेतली.