प्रतिनिधी / मिरज
माधवनगर तालुका मिरज येथील उपसरपंचपदी सत्ताधारी गटाचे देवराज बागल यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड झाली.
निर्मला पवार यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी देवराज बागल यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सरपंच पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य व विविध संघटनांच्या वतीने बागल यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बागल यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी त्यांचे अभिनंदन केले