नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीला चालू वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत 249.4 कोटी रुपयांचा निक्वळ तोटा झाला आहे. अशी स्थिती ही कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर प्रथमच झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे जून तिमाहीत वाहनांची विक्री मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाली आहे. मागील वर्षातील समान तिमाहीत कंपनीला 1435.5 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यावेळी मात्र विक्रीत घट होत 3,677.5 कोटी रुपये राहिली आहे. जूनच्या तिमाहीत कंपनीने 76599 वाहनांची विक्री केली आहे. यामध्ये कंपनीने देशातील बाजारांमध्ये 67027 युनिटस्ची विक्री करुन 9572 वाहनांची निर्यात केली आहे. आपल्या सर्व कर्मचाऱयांच्या आरोग्य आणि सुरक्षेसंबंधीची काळजी कंपनीने घेतली आहे.