वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारी वीज कंपनी एनटीपीसीने एका दिवसामध्ये सर्वाधिक वीज निर्मिती करुन आपल्या नावावर नवीन विक्रमाची नोंद केली आहे. कंपनीने 28 जुलै रोजी 977.07 दशलक्ष युनिटस्ची वीज निर्मिती केली आहे. आतापर्यंत एका दिवसात अशी कामगिरी करणारी एकमेव कंपनी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. सहयोगी कंपनी आणि संयुक्त उपक्रमातील कंपन्यांचाही या उत्पादन निर्मितीत समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीच्या पाच स्टेशन्सवर वीज उत्पादनातून ही उच्चांकी कामगिरी केल्याची नोंद आहे. मंगळवारी या प्रकल्पांनी आपली क्षमता पूर्ण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला आहे. यामध्ये छत्तीसगढ, ओडिसा आणि हिमाचलमधील प्रकल्पांचा समावेश आहे.
विक्रमामध्ये 12 मार्च 2019 रोजी अशी कामगिरी केली होती. त्यावेळी 935.46 दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली होती. एनटीपीसीने एकूण वीजनिर्मितीची क्षमता 62,910 मेगावॅट असून ग्रुपची एकूण 70 पॉवर स्टेशन्स आहेत. यामध्ये 24 कोळसा, 7 गॅस व इंधनावर आधारीत, एक हायड्रो, 13 रिन्यूएबल एनर्जी आणि सोबत 25 संयुक्त प्रकल्प आहेत.