बेळगाव : बेळगाव शहर क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय आणि मार्कंडेय हायस्कूल, मार्केट यार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने 29 रोजी बेळगाव शहर विभागातील विज्ञान विषय शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून शहर क्षेत्रशिक्षणाधिकारी रवी बजंत्री उपस्थित होते. पाठय़पुस्तक वितरण विभागाचे प्रमुख बी. मुदकनगौडर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मार्कंडेय हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एन. जे. चौगुले होत्या. व्यासपीठावर विज्ञान नोडल अधिकारी एस. ए. कळ्ळेकर, फोरम अध्यक्ष एस. एन. जोशी, फोरम सेपेटरी एस. व्ही. भातकांडे, कार्यशाळेचे संपन्मूल व्यक्ती डॉ. संदीप देशपांडे (प्राध्यापक जीएसएसे कॉलेज) व कीर्ती चिंचणीकर (बालिका आदर्श विद्यालय) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटोपूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
बेळगाव शहर क्षेत्र शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी मार्कंडेय ऋषींच्या जीवनाबद्दल माहिती सांगून वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले पाहिजे, तसेच वाचनाचे महत्त्व याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे संपन्मूल व्यक्ती डॉ. संदीप देशपांडे यांनी अनेक अनुभव कथन करत विविध क्षेत्रातील थोर व्यक्तींची उदाहरणे देत मार्गदर्शन केले. कीर्ती चिंचणीकर यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देऊ शकतो, याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये विज्ञान विषयाबद्दल शिक्षकांनी चर्चा केली. सूत्रसंचालन आर. एम. अष्टेकर यांनी केले. शिक्षिका आर. जी. पाटील यांनी आभार मानले.