नवी दिल्ली
एमजी मोटार इंडियाने बुधवारी दिलेल्या महितीनुसार मार्च 2020मध्ये किरकोळ वाहनांची विक्री 1,518 इतकी झाली आहे. यामध्ये 116 झेडएस इव्ही आणि 1,402 हेक्टर एसयूव्हीचा यामध्ये समावेश आहे. कंपनी दिलेल्या एका माहितीनुसार एमजी हेक्टर आणि एमजी झेडएस इव्ही या दोन्ही मॉडेलने भारतीय कार बाजारात आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर आपली श्रृंखला कायम ठेवत एमजी मोटारने आपल्या ग्राहकांची सेवा सुरु ठेवली असल्याचे कंपनीने सांगितले आहे.