पहिल्याच दिवशी 18 हजाराचा दंड वसूल
सावंतवाडी:
वाढत्या कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने शहरात मास्क वापर न करणाऱयांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. रविवारी सायंकाळी सात वा. पर्यंत 36 वाहनचालकांकडून 500 प्रमाणे कारवाई करून 18 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी केले आहे. दंड भरण्यास नकार देणाऱयांवर गुन्हे दाखल केले जातील. वेळ पडल्यास वाहने जप्त केली जातील, असा इशारा खोत यांनी दिला आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी जिल्हय़ात राबविण्यात येत आहे. पोलीस यंत्रणाही हायअलर्ट ठेवली आहे. सावंतवाडी शहरात नागरिक मास्क न वापरता खरेदीसाठी व कामाशिवाय बाजारात पायी, दुचाकीने फिरत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या आदेशानुसार शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विनामास्कशिवाय फिरणाऱयांवर शासनाच्या आदेशान्वये पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. कारवाई गेले पंधरा दिवस राबवित असतानाही बाजारात विनामास्कशिवाय फिरताना दिसत आहे. त्यामुळे रविवारपासून या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे फर्मान पोलीस विभागाने काढले आहेत. प्रत्येकाने मास्क लावूनच घरातून बाहेर पडावे. कामाशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहन पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयराम पाटील, वाहतूक पोलीस सुनील नाईक, सखराम भोई, पोलीस कर्मचारी मनोज राऊत, उमेश राणे व जयराम लोके यांनी केले.
नगरपालिकेची कारवाई थंडावली
राज्यशासनाच्या आदेशानुसार पोलीस नगरपालिका प्रशासनाने कारवाई राबविणे गरजेचे आहे. मात्र, शहरात पोलीस यंत्रणाच मास्क न वापरणाऱया नागरिकांवर कारवाईचा बडगा करत आहे. पोलिसांवर जबाबदारी टाकून नगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्याचे पथक बाजारपेठेतच दिसत नाही. जर दोन्ही प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी वेगवेगळी कारवाई केली तरच दंडाच्या भीतीने नागरिक मास्क लावूनच बाजारात येणार आहे. कायमची शिस्त व स्वत: काळजी घेण्याची सवय कायम राहणार आहे. ��ी महाडिक, अनुश्री पारकर, प्रिया नलावडे, त्याचप्रमाणे मिठबाव ग्रामपंचायत सदस्य पूनम मयेकर, देवगडमधील युवक सायली जाधव, भावना कुलकर्णी, श्रेयान बांदिवडेकर, हर्षल भुजबळ यांनीही उपस्थिती दर्शविली.