प्रतिनिधी / वैराग
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे अपक्ष उमेदवार मा.आमदार दतात्रय अच्युतराव सावंत यांचे प्रचारार्थ अर्णव शैक्षणिक संकुल, सासुरेफाटा, वैराग ता. बार्शी येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी प्राचार्य रविंद्र कापसे तर प्रमुख पाहुणे म्हणुन पंढरपुरचे प्राध्यापक, तुकाराम मस्के उपस्थित होते. या प्रचार मेळाव्यास बार्शी तालुक्यातुन विविध हायस्कुल, कॉलेजचे शिक्षक मतदार बांधव प्रचंड उत्साहात मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र कापसे सर, प्रमुख पाहुणे म्हणुन प्राध्यापक तुकाराम मस्के सर, उपस्थित होते प्राचार्य सुरेश गुंड सर,राजु उकिरडे सर, राजकुमार पुजारी, मुकूंद मोहिते या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सुरेश गुंड यांनी उपस्थितांना संबोधीत करताना आमदार सावंत यांनी मतदार संघात केलेल्या कामाचा, शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविल्याचा आढावा सादर करत पुढेही अनेक प्रश्न सोडावयाचे आहेत त्याकरिता आमदार दत्तात्रय सावंत सरांना प्रथम पसंतीचे मतदान देणेचे आवाहन केले, प्रा. तुकाराम म्हस्के यांनी सावंत सरांची शिक्षकांशी असलेला संपर्क, विधान परिषदेत मांडलेले प्रश्न, आंदोलने, उपोषणे, पायी दिंडी काढुन, शिक्षकांचे सोडविलेले प्रश्न, यावर विचार मांडुन आमदार दत्तात्रय सावंत यांना प्रचंड मतानी विजयी करण्याचे आवाहन केले.
या सभेचे प्रास्ताविक बाळे पतसंस्थेचे माजी चेअरमन मुकूंद मोहिते यांनी केले, या मेळाव्यास सोलापुर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजु उकिरडे सर, बार्शी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार पुजारी सर, उपाध्यक्ष धनंजय चिकणे सर, आदिंसह प्रचंड मोठया संख्येने शिक्षक मतदार उपस्थित होते आभार पिंटु कापसे सर यांनी मानले.