प्रतिनिधी /पणजी
क्लब टेनिस डी गॅस्पर डायस येथे नवीन क्रेमेक्स पिझ्झा आणि बेकरी कॅफेचे उद्घाटन करण्यात आले. या कॅफेचे उद्घाटन अध्यक्ष राजेश खंवटे, क्रेमेक्स मिरामार पणजीचे अध्यक्ष डेल मिनेझिस आणि व्हिन्सेंट डायस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सचिव एडविन मिनेझिस, तसेच उद्योगपती आणि गॅस्पर डायस मंडळाचे सदस्य राजेश धेंपो, मनोज काकुलो, सुनील नायक, योगेश नाडकर्णी, तन्मय खोलकर उपस्थित होते. क्रेमेक्स कॅफे जेवणासाठी तसेच पिझ्झा, सँडविच, केक आणि स्वादिष्ट मिष्टान्नांसाठी प्रसिद्ध आहे.