नेहमीच चर्चेत राहणारी मलायका अरोरा आता ‘मिसेस इंडिया क्वीन 2021- पहचान मेरी’ या स्पर्धेत परीक्षक म्हणून दिसून येणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे फिनालेमध्ये मलायका परीक्षक म्हणून भूमिका बजावणार आहे. ही स्पर्धा 29 सप्टेंबर रोजी सुरू होत 3 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
पीजेंटच्या संस्थापिका श्वेता रॉय यांनी मलायकाला ज्युरी टीममध्ये सामील करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मलायका नेहमीच स्वतःसाठी ठाम भूमिका घेते आणि योग्य गोष्टींचे समर्थन करते. तिच्या व्यक्तिमत्वामुळेच तिला टीममध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. मलायका मजबूत निर्धार असलेल्या महिलांचे प्रतिनिधित्व करते. तिने स्वतःची ओळख निर्माण केली असल्याचे रॉय म्हणाल्या.
सर्व विवाहित महिलांना एक व्यासपीठ, आवाज आणि ओळख मिळवून देण्याची इच्छा आहे. मी स्वतः एक इंटरनॅशनल पीजेंट विजेती असल्यानेच या स्पर्धेची सुरुवात केली असल्याचे श्वेता यांनी म्हटले आहे.
मलायका सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. स्वतःची छायाचित्रे आणि चित्रफितींद्वारे ती चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरित करते. 47 वर्षे वय असून देखील मलायका नव्या अभिनेत्रींशी स्पर्धा करत आहे. याचबरोबर बॉयप्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या अफेयरमुळे ती चर्चेत असते.