महिलांकडून दिवाळीपूर्वी लाईटबिल वसूल करून कार्यालयात भरले नाही :
प्रतिनिधी/ बेळगाव
घरोघरी जाऊन वीज मीटरचे रिडिंग घेणाऱया मीटर रिडरने केलेल्या प्रतापामुळे हेस्कॉमचे नाकीनऊ आले आहेत. महाद्वाररोड परिसरात मीटर रिडरने काही महिलांकडून दिवाळीपूर्वी लाईटबिल वसूल करून ती रक्कम कार्यालयात भरली नाही. यामुळे ग्राहकांना पुन्हा वीजबिल भरण्याची सूचना करण्यात आल्यानंतर झालेला प्रकार निदर्शनास आला. यामुळे महाद्वाररोड परिसरात गोंधळ निर्माण झाला असून लवकरच हेस्कॉम अधिकाऱयांची भेट घेण्याची तयारी केली जात आहे.
प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेमध्ये मीटर रिडर घरोघरी जाऊन रिडिंग घेतात. काही नागरिक वेळ वाचविण्याच्या नादात मीटर रिडरकडेच बिलाची रक्कम देतात. परंतु काही वेळा ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत मीटर रिडरकडून बिल भरलेली पावती दिली जात नाही. मिळालेली रक्कम इतरत्र वापरून त्यानंतर ती हेस्कॉमच्या कार्यालयात भरण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकवेळा घडले आहेत.
असाच प्रकार गुरुवारी महाद्वाररोड तिसरा क्रॉस येथे घडला. मीटर रिडरकडे गल्लीतील महिलांनी बिलाची रक्कम दिवाळीपूर्वी दिली होती. परंतु मीटर रिडरने संबंधित रक्कम कार्यालयात न भरल्यामुळे गुरुवारी हेस्कॉमचे कर्मचारी गल्लीत पोहोचले. त्यावेळी बिल भरले असतानाही बिल भरण्याची सूचना केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी त्यांच्यासमोर केली. यावेळी घडलेला हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. संबंधित कर्मचाऱयाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. यामुळे हेस्कॉम कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले.
कर्मचाऱयावर कारवाई करण्याची गरज
नागरिकांनी दिलेल्या वीज बिलाची रक्कम परस्पर स्वत:कडे ठेऊन त्याचा दुसरा उपयोग करण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकवेळा घडले आहेत. परंतु नागरिकांकडून लेखी तक्रार दिली जात नसल्याने असे प्रकार उघडकीस येत नाहीत. तसेच अशा कर्मचाऱयांवरही हेस्कॉमच्या वरि÷ अधिकाऱयांकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी अद्याप कार्यालयापर्यंत लेखी तक्रार आली नस्sस्कॉम कार्यालयात जाऊन लेखी तक्रार जाणे गरजेचे बनले आहे. असे प्रकार वारंवार घडू नये यासाठी अधिकाऱयांनी कर्मचाऱयांवर कारवाई करण्याची गरज आहे.