4 महिन्याच्या बाळावर आईकडून कुऱहाडीने वार
मध्यप्रदेशच्या अशोकनगर येथे हृदयाचा थरकाप उडविणारी घटना घडली आहे. चुरारी गावातील एका महिलेने स्वतःच्या 4 महिन्यांच्या बाळावर कुऱहाडीने वार करत त्याची हत्या केली आहे. या महिलेची मानसिक स्थिती बरी नसल्याचे समजते. ही महिला अनेक दिवसांपासून एका कथित संताचे प्रवचन ऐकत होती. तिचे वागणं काही दिवसांपासून सामान्य वाटत नव्हते. मोबाईलद्वारे युटय़ूबवर ती बहुतांश वेळ एका संताची प्रवचने ऐकायची आणि त्यालाच देव मानायची.
बाळाची हत्या केल्यावर कुटुंबीयांनी संबंधित महिलेला याबद्दल विचारणा केली असता तिने ‘मी तर बकऱयाला मारले आहे’ असे विचित्र उत्तर दिले होते.