ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 10 यादीतून उद्योगपती मुकेश अंबानी यांचे स्थान घसरले आहे. ते आता 11 व्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांची संपत्ती 102 अब्ज डॉलर्स आहे. अंबानींची जागा आता वॉरन बफे यांनी घेतली असून, त्यांची संपत्ती 103 अब्ज डॉलर्स एवढी आहे. ब्लूमबर्ग बिलिअनर्स इंडेक्सने यासंदर्भात आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे एलन मस्क प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत या वर्षी 66.5 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून, त्यांची एकूण संपत्ती 236 अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. दुसऱया क्रमांकावर अमेझॉनचे जेफ बेझोस आहेत. त्यांची संपत्ती 197 अब्ज डॉलर आहे. तर तिसऱया क्रमांकावर बनॉर्ड अरनॉल्ट असून, त्यांची संपत्ती 164 अब्ज आहे. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांची संपत्ती 130 अब्ज डॉलर असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत.