- महाविकास आघडीमधील कुरबुर चव्हाट्यावर
ऑनलाईन टीम / परभणी :
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले, नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असे त्यांनी सांगितले. मराठवाडा दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, शिवसेनेसोबत जाण्याबाबत दिल्लीतील नेते नाराज होते, मात्र राज्यात भाजपकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरू होती. त्यामुळे मी स्वतः जाऊन त्यांना भाजपला सत्तापासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागेलच हे पटवून दिल्याने आपण महाविकास आघाडीत सामील झाल्याचे वक्तव्य देखील चव्हाण यांनी यावेळी केले.
अशोक चव्हाण यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर देखील टीकास्त्र सोडले आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेले खड्डे बुजवण्याचे काम सध्या मला आहे, तेच मी करतोय. संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते झाले पाहिजेत यासाठी मी विमानाने नाहीतर कारने जास्त फिरतोय, असा सणसणीत टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना परभणीत लगावला.