ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी मानेच्या दुखण्यामुळे रिलायन्सच्या हरकिसनदास रुग्णालयात दाखल झाले होते. आज सकाळी त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गुरुवारी काही चाचण्या करण्यात आल्या. त्याचे अहवाल काल सायंकाळी आल्यानंतर मानेची छोटी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया सुरू झाली. पाऊने नऊ वाजता शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शस्त्रक्रियेनंतर आठवडय़ाभराच्या विश्रांतीनंतर मुख्यमंत्र्यांवर फिजिओथेरपी सुरू होणार आहे.