बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई शुक्रवारी प्रथमच नवी दिल्लीला पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले असल्याने त्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. त्यांनी शुक्रवारी दिवसभरात प्रथम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यांनतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दरम्यान, आज मुख्यमंत्री बोम्माई अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मागील वर्षासाठी आणि या वर्षी देखील परताव्याबाबत मी आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना भेटत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.