प्रतिनिधी/ रत्नागिरी
महिला रूग्णालय टप्पा – 2, रत्नागिरी येथील 200 खाटांच्या व ओणी, ता. राजापूर येथील 30 खाटांच्या कोव्हीड समर्पित रूग्णालयाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री, यांच्याहस्ते 30 मे रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाला परिवहन व संसदीय कार्य मंत्री, तथा पालकमंत्री ऍड अनिल परब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, खासदार सुनील तटकरे अध्यक्ष, रत्नागिरी लोकसभा सदस्य आमदार ऍड. निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार अनिकेत तटकरे, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, राजापूरचे आमदार राजन साळवी, चिपळूणचे आमदार शेखर निकम, दापोली-खेडचे आमदार योगेश कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय. विभागिय आयुक्त कोकण विभाग अण्णासाहेब मिसाळ, यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यासर्वलोकार्पणसोहळ्याचेप्रक्षेपणफेसबुकलाईव्हद्वारेथेटपाहतायेणारआहे.याकार्यक्रमाचालाभघ्यावाअसेआवाहनलक्ष्मीनारायणमिश्रा,जिल्हाधिकारीरत्नागिरीयांनीकेलेआहे