वार्ताहर / सांबरा
मुतगा येथे श्री शिवप्रति÷ान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडला साधेपणाने व शासनाचे नियम पाळून प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी वेशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रेरणा मंत्राने दौडला प्रारंभ करण्यात आला. यंदा कोरोनाचे सावट असल्याने दौड साधेपणाने काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक कार्यकर्त्याने मास्क वापरून व शासनाचे नियम पाळून दौडमध्ये भाग घेतला. गावातील प्रमुख मार्गावरून जात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर ध्येयमंत्राने दौडची सांगता करण्यात आली.