प्रतिनिधी / बेळगाव
यंदे खुट येथील एका इमारतीसमोर एक बॉक्स व दोन पोती टाकण्यात आली होती. चार दिवस उलटले तरी ती कोणीच घेऊन जात नसल्याने अखेर परिसरातील नागरिकांनी ती खुली करून पाहिली. त्यात औषध व गोळय़ांचा साठा असल्याचे दिसून आले. या गोळय़ा-औषधांची मुदत संपली असल्याने टाकण्यात आले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुदत संपलेली औषधे नेमकी कुठे पाठविण्यात येत होती यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱया यंदे खुट येथील कॉर्पोरेशन बँकेच्या बाजूला असणाऱया इमारतीमध्ये औषधे व गोळय़ांनी भरलेली दोन पोती व एक बॉक्स टाकण्यात आले होते. दोन दिवस तो कोणीच न उचलल्याने संशय व्यक्त करण्यात येत होता. अखेर ते उघडून पाहिल्यावर त्यामध्ये गोळय़ा व औषधे दिसून आली. त्या सर्वांची मुदत संपल्याचे दिसून आल्याने नेमकी ही औषधे कोणी पाठविली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.