हार्वर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांकडून संशोधन
@ वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
भारतात मुलांना शिस्त लावण्यासाठी आई-वडील किंवा पालक त्यांच्या कानाखाली, थोबाडीत मारत असतात. आमच्यापैकी असे अनेक जण असतील, ज्यांचे बालपण अशा आठवणींनी भरलेले असेल. पण आता हार्वर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी मुलांच्या थोबाडीत मारल्यास त्यांच्या मेंदूच्या विकासावर प्रभाव पडू शकतो असा दावा केला आहे. यासंबंधी संशोधनासाठी वैज्ञानिकांनी 147 मुलांचा अभ्यास केला आहे.
थप्पड ही कुपोषण आणि हिंसेसमानच मुलांच्या मानसिक विकासाला प्रभावित करू शकते असे संशोधकांना आढळून आले आहे. या संशोधनादरम्यान ज्या मुलांना थप्पड लगावण्यात आली होती, त्यांच्या प्रीप्रंटल कॉर्टेक्स (पीएफसी)च्या अनेक भागांमध्ये मज्जातंतू प्रतिक्रिया दिसून आली. यामुळे मुलांमधील निर्णय घेण्याची आणि अवघड स्थितीला सामोरे जाण्याची क्षमता संपुष्टात येऊ शकते.
अनेक देशांमध्ये गुन्हा
अमेरिकेत मुलांना थप्पड लगावणे हा गुन्हा आहे. तर स्कॉटलंडमध्ये 2020 पासून मुलांना शारीरिक शिक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये आई-वडिल मुलांना थप्पड लगावू शकतात, पण त्यामुळे त्याला जखम, सूज येता कामा नये. जर मुलाच्या शरीरावर असा कुठलाही परिणाम दिसून आल्यास संबंधित आई-वडिलांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
मुलांमध्ये चिंता-नैराश्य
हार्वर्डच्या टीमचे नवे संशोधन विद्यमान अध्ययनांवर आधारित आहे, हे संशोधन मुलांच्या मेंदूच्या काही क्षेत्रांमध्ये सक्रीय हालचाली दर्शवितात. ज्या मुलांचे कुटुंबीय शारीरिक शिक्षेचा वापर करतात, अशा मुलांमध्ये चिंता, नैराश्य, वर्तनाची समस्या आणि अन्य मानसिक समस्या उद्भवू शकतात असे या संशोधनाचे लेखक आणि हार्वर्डच्या मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका केटी ए. यांनी म्हटले आहे.
एमआरआयने दर्शविला प्रभाव
केटी ए. आणि त्यांच्या तीन सहकाऱयांनी 3-11 वर्षांच्या मुलांच्या शरीरावरील थप्पडच्या प्रभावांमुळे मिळालेल्या डाटाचे विश्लेषण केले आहे. त्यांनी मॅग्नेटिक रिसोनेंस इमेजिंग (एमआरआय) मशीनद्वारे प्रत्येक मुलाची तपासणी केली. हे मशीन मजबूत चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ तंरगांचा वापर करून शरीराच्या आतील विस्तृत इमेज तयार करते. यातून संशोधकांना दोन प्रकारच्या इमेजेस प्राप्त झाली आहेत. काही मुलांचे चेहरे घाबरलेले होते, तर उर्वरितांचे चेहरे तटस्थ भावमुद्रेतील होते.