वृत्तसंस्था/ मेंझ
रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या बुंदेस्लिगा फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात खेळताना मेंझ क्लबचा 22 वर्षीय फुटबॉलपटू ऍवोनियी आकडी येऊन तो मैदानातच बेशुद्ध झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मेंझ आणि ऑग्सबर्ग यांच्यातील हा सामना खेळविला गेला होता. ऑग्सबर्गने मेंझचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी झगडत असताना ऍवोनियी आणि ऑग्सबर्ग संघातील फेलिक्स यांच्यात जोरदार टक्कर झाली. यामध्ये ऍवोनियीच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर आकडी येऊन तो बेशुद्ध झाला. रूग्णालयात त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची स्थिती स्थिर असल्याचे डॉक्टारांनी सांगितले.