प्रतिनिधी / अक्कलकोट
मैंदर्गी ता.अक्कलकोट येथे जेष्ठ नागरिकाला हातपाय बांधुन मारहाण करून ८७ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला. अज्ञात चार इसमांनी घराचा बाहेरील दरवाजा तोडून घरात प्रवेश करून फिर्यादीस लोखंडी सळईने मारहाणे करून जबर जख्मी करून जबरदस्तीने एकूण ८७ हजार रुपयाचा रोख रक्कम व ऐवज चोरून नेला. इब्राहिम लालअहमंद रोड्डे (वय ६२वर्षे) वैदय हकीम, राहणार प्राथमिक आरोग्य केंद्राचे पाठीमागे संगोळगी रोड मैंदर्गी यांनी फिर्याद दिली. याबाबत दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरूद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असुन याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी पत्नी, मुलगा व मुलगी यांचेसह राहणेस असून पत्नीला किडनीचा त्रास असल्याने तिच्यावर बेळगांव येथे उपचार सुरू आहेत.
त्याकरिता मुलगा व मुलगी असे पत्नीसोबत बेळगाव येथे असलेने सध्या फिर्यादी घरी एकटाच होता. फिर्यादी राहते घरीच पैदया हकीमचे कामकाज करत असतो. पत्नीच्या उपचारासाठी साठ हजार रुपये टेबलचे ड्राव्हरमध्ये ठेवले होते.७ जानेवारी ला रात्री ११ वाजता झोपले. रात्री दीड वाजता आवाज आल्याने झोपेतून उठले तर समोर चार व्यक्ती हे त्याचा चेहरा पुर्णपणे मास्कने झाकलेले हातात लोखंडी सळ्या घेऊन थांबलेले होते. काही विचारण्याच्या आधीच यापैकी एकांने लोखंडी सळईन डोक्यात मारले व इतर तिघांनिही लोखंडी सळईने मारहाण केली. प्रतिकार करतानाच फिर्यादी बेशुध्द झाले. साडेतीन वाजता शुद्धीवर आल्यावर हात आणि पाय टॉवलने बांधलेले दिसले. हात पाय सोडवुन पाहिले असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.
घरातील टेबलचे ड्राव्हरमधील पतीच्या उपचारासाठी ठेवलेले साठ हजार रूपये, दोन रँडो कंपनीचे घड्याळ अंदाजे किंमत पंधरा हजार रूपये, वापरते तीन मोबाईल अंदाजे किंमत १२ हजार रूपये असे एकुण ८७ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला. जाताना दरवाजा बाहेरून कडीने बंद केल्याने दरवाजा उघडता आला नाही. सकाळी आठ वाचे सुमारास फिरायला जाणा-या हाजिमा हिच्या मदतीने घराबाहेर आले. घटनास्थळाला ग्रामीण पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी भेट देऊन पाहणी केली.
दुपारी साडेतीन वाजता ‘सँम’ डाँग च्या पथकासह हँन्डलर शिवानंद सौदागरे यांनी भेट देऊन तपास केला. श्वान शाब्दी पेट्रोल पंपापर्यंत अक्कलकोट रोडवर माग काढला व परत फिरले. त्या ठिकाणी दोन मोबाईल सापडले. श्वान घटनास्थळावरून अक्कलकोट रोडवर पेट्रोल पंपापर्यंत गेले व परत मागे घुटमळले अशी माहिती श्वानपथक हँन्डलर पोलीस हवालदार शिवानंद सौदागरे यांनी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे करीत आहेत.