लवकरच होणार धावपट्टीची चाचणी
प्रतिनिधी / पणजी
मोपा विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा आता पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे. काल गुरुवारी या विमानतळावरून एका छोटय़ा विमानाने कॅलिबरेशन ट्रायल घेतली. मात्र हे विमान धावपट्टीला स्पर्शही करून गेलेले नाही. लवकरच विमानाची धावपट्टीवरून चाचणी होईल.
गोव्याचे नागरी हवाई खात्याचे संचालक डॉ. शानभोग यांनी सांगितले की वास्तविक ही चाचणी 15 दिवसांपूर्वीच होणार होती. जोरदार पाउस व धुके यामुळे ही चाचणी घेता आली नाही. आता गुरूवारी पावसाचे प्रमाण फारच कमी राहिल्याने नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने चाचणी घेण्यास परवानगी दिल्यानंतर ही चाचणी घेण्यात आली. हे विमान धावपट्टीवर उतरले नाही वा स्पर्शही करून गेलेले नाही. प्रत्यक्षात धावपट्टीवर विमान उतरविण्यासाठीची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे.