नगरसेवकाविरोधात गाळेधारकांचे गाऱहाणे : सामान काढण्यास एक दिवसाची मागणी अभियंता वर्गांनी धुडकावली
प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा गांधी चौकाजवळ पर्रा म्हापसा रस्त्यावर असलेले 13 गाळे अखेर पालिकेने जमीनदोस्त केले. सुमारे 40 वर्षाहून अधिक काळापासून उभे केलेले हे गाळे मोडीत असताना गाळेधारकांना आपले अश्रू आवरता आले नाही. उपस्थित संयुक्त मामलेदार व अभियंता वर्गांना आम्हाला फक्त एक दिवस द्या आम्ही आमच्या दुकानातील सर्व सामान काढतो अशी विनंती गाळेधारकांनी केली मात्र तुम्हाला यापूर्वीच पुरेशी वेळ दिली होती, आम्ही कायद्याचे पालन करतो असे सांगून कारवाई सुरूच ठेवली. आमच्या पोटावर ज्यांनी कुणी कुऱहाड मारली त्यांना बोडगेश्वर देव पाहून घेईल, असे गाऱहाणेही यावेळी गाळेधारकांनी घातले.
रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली 13 गाळे हटविले
म्हापसा गांधी चौकानजीक काणका येथे जाणाऱया रस्त्यावर गेली 40 ते 50 वर्षांपासून रस्त्याच्या बाजूला 13 गाळे उभे होते. रस्त्याचे रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या नावाखाली हे गाळे हटवावे अशी मागणी पालिकेने केली असता या विरोधात हे गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. माजी नगरविकासमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी या सर्वांना त्यावेळी आपल्याकडे बोलावून तुम्हा सर्वांना इतरत्र सामावून घेतो असे आश्वासन दिले होते. कालांतराने म्हापसा टॅक्सी स्थानकावर पहिल्या व दुसऱया मजल्यावर गाळे उभारण्यात आले खरे त्यात पहिल्या मजल्यावर या 13 जणांना सामावून घेण्यात आले.
गाळे ताब्यात घेण्याचा नगराध्यक्षाचा आदेश
नवीन गाळय़ाना अद्याप वीज, पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही असा आरोप येथील गाळेधारकांचा आहे. शिवाय आम्ही चाव्या करणे, गॅरेजमध्ये दुचाकी गाडय़ा दुरुस्त करतो अशा परिस्थितीत पहिल्या मजल्यावर आमचा व्यवसाय करू शकणार नाही असे म्हणणे होते. 11 जुलै रोजी म्हापसा पालिकेने या 13 जणांना नोटीस बजावून येथील सर्व गाडे हटवून तुम्ही त्वरित दिलेल्या जागेत ताबा घ्यावा असे सूचित केले. याबाबत जाब विचारण्यास या सर्वांनी ननगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांची भेट घेतली असता त्यांनी जे गाळे तुम्हाला दिलेले आहेत त्यांचा ताबा घ्या असे सूचित केले. अन्यथा तेही मिळणार नाही असे सांगितले.
सकाळी कारवाईस सुरुवात
सकाळी 11.30 वा.च्या दरम्यान वीज खात्याचे कर्मचारी या 13 गाळय़ाजवळ येऊन मीटरची वीज तोडली. 12 वा. बार्देशचे संयुक्त मामलेत्दार राजाराम परब, पालिका अभियंता प्रशांत नार्वेकर, कनिष्ठ अभियंता, मार्केट निरीक्षक शेखर गावस, हेडक्लार्क विनय आगरवाडेकर, पोलीस उपनिरीक्षक वीभा वळवईकर, पोलीस फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले व नंतर कारवाई सुरू करण्यात आली.
अधिकाऱयांनी गाळेधारकांची विनंती फेटाळली
येथील गाळेधारक गजानन नाईक, शेखर घाडी, भारत च्यारी, दत्ताराम पेडणेकर आदीनी उपस्थित अधिकारी वर्ग संयुक्त मामलेतदार राजाराम परब, पालिका अभियंता प्रशांत नार्वेकर आदींना आम्हाला एक दिवसाचा वेळ द्या आम्ही आमच्या गाळय़ातील सर्व सामान बाहेर काढतो नंतर तुम्ही आमच्या गाळय़ावर बुलडोझर चालवा अशी विनंती केली असता अधिकारी वर्गांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. याबाबत आम्ही काही मदत करू शकत नाही न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई करण्यास येथे आलो आहोत आणि आम्ही आमची डय़ुटी बजावतो असे अधिकारी वर्गंनी त्यांना स्पष्ट केले.
पालिके विरोधात गाळेधारकांचे श्री बोडगेश्वराकडे गाऱहाणे
गाळे खाली करण्यासाठी फक्त एक दिवसाची अवधी मागूनही ती अधिकारी वर्गांनी फेटाळल्याने हे गाळेधारक खूप भावूक झाले. त्यांनी विनंती करूनही त्यांची दखल न घेतल्याने सर्व गाळेधारकांनी पुढे येऊन श्री देव बोडगेश्वरावा साकडे घालत आमच्या पोटावर ज्यांनी कुणी पाय ठेवला त्यांना पाहुन घ्या असे साकडे घातले. समाजसेवक संजय बर्डे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
बॉक्स करणे
नगराध्यक्ष म्हणाल्या ‘नो कॉमेंट’
दरम्यान याबाबत म्हापसा नगरपलिकेच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांची भेट घेऊन याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नस्कार करून ‘नो कॉमेंट’ असे म्हणून बोलण्यास टाळले. दरम्यान हे गाळे मोडण्यामागे राजकीय कटकारस्तान असल्याचा आरोप गाळेधारकांनी केला. गाळय़ामागील खुल्या जागेत आमदार मोठा प्रकल्प उभा करू पाहत असल्याचा आरोप गाळेधारकांनी केला.