केंद्रीयमंत्री सिंधिया यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे सायंकाळी गोव्यात आले असून मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत केले. दाबोळी विमानतळ हे दखील मोप विमानतळाबरोबर चालूच राहिले पाहिजे, अशी मागणी गुदिन्हो यांनी यावेळी केली असता केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी हा प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्याचबरोबर आज मोप विमानतळाच्या उद्घाटनाच्यावेळी ते या सदंर्भातील घोषणा करण्याची शक्यता आहे. मोप चालू झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ हे देखील चालू ठेवण्याचा इरादा सिंधिया यांनी व्यक्त केला.