देशातील आकडेवारी अहवालामधून सादर
नवी दिल्ली
भारतामधील मोबाईल ब्रॉडब्रँड वापरणाऱयांची संख्या मागील पाच वर्षात दुप्पट होत 76.5 कोटींवर पोहोचली आहे. तसेच 4जी डाटा ट्रफिक 6.5 पट वाढल्याचीही माहिती नोकियाकडून सादर केलेल्या अहवालामधून सांगितली आहे.
वार्षिक नोकिया एमबीआयटी अहवालाचे सादरीकरण करण्यात आले असून यामध्ये देशातील एकूण डाटा विक्रीत 4 जी इंटरनेट सेवांचा हिस्सा हा 99 टक्के राहिला आहे. यामध्ये 5 जी इंटरनेटच्या आगमनानंतर यामध्ये आगामी काही वर्षापर्यंत वृद्धी राहणार असल्याचे संकेत नोकियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारतातील प्रमुख संजय मलिक यांनी स्पष्ट केले.
वर्ष 2017 ते 2021 पर्यंत मोबाईल डाटाचा वापराचा वार्षिक वृद्धीदर (सीएजीआर) वधारुन 53 टक्क्यांवर राहिला आहे. याच दरम्यान मोबाइल वापरकर्त्यांनी प्रत्येक महिन्याला केलेला डाटाचा वापर तीन पट वधारलेला आहे. सध्या 17 जीबी पर्यंत प्रति महिना इतका डाटा वापरला जातो आहे. मागील पाच वर्षात मोबाईल ब्रॉडब्रँड वापरणाऱयांची संख्या 2.2 पटीने वाढली आहे.