प्रतिनिधी /तिसवाडी
मौळा भाटी तिसवाडी येथे श्री बाल गणेश मंडळाच्या सात दिवस चालणाऱया बालगणेश उत्सवाची आज शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी सांगता होणार आहे.
त्यानिमित्त आज शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी नित्यपूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व नंतर वर्षपध्दतीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4 वा. प्रसिध्द भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम. रात्री 8 वा. बाल गणेश मंडळाच्या घुमट आरत्या तिर्थप्रसाद व नंतर भाविक-भक्तांच्या दिडींने श्री बाल गणेशाची विसर्जन मिरवणूक निघेल. भाविक भक्तांनी मोठया संख्येने अपस्थित राहून तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.