प्रतिनिधी /म्हापसा
सिद्धी नाईक प्रकरण सुरू असतानाच आता म्हापसा येथील रुद्रेश पिळर्णकर हा युवक बेपत्ता झाल्याने म्हापशात चर्चेला उत आली आहे. रुद्रेश नेमका घरातून का गेला हा प्रश्नचिन्ह सर्वांपुढे निर्माण झाला आहे. दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान हातात पाण्याची बाटली घेऊन करासवाडा म्हापशाहून तो चालत जाताना सीसीटीव्ही पॅमेरामध्ये आढळून आला आहे.
नेमका रुद्रेश कुठे गेला, काय आहे यामागचे गुढ असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे. गेल्या दोन दिवसापासून रुद्रेश बेपत्ता झाला आहे. दरम्यान रुद्रेश याची उंची 5 फीट 3 इंच, वय 24 वर्षे आहेत, शेवटी तो दि. 25 रोजी सायं. 4 वा. करासवाडा म्हापसा येथे सीसीटीव्ही पॅमेरामधून आढळून आला होता. त्याने काळय़ा रंगाचे परिधान केले होते व काळी ट्रक पॅन्ट आहे. तो कुठे आढळल्यास स्थानिक पोलीस स्थानकात संपर्क साधावा.