प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर संस्थान या भक्तवत्सल भक्ती भिमानी जागृत देवस्थानचा 27 वा वर्धापनदिन सोहळा बुधवार दि. 8 रोजी मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी 10 वा. देवस्थानचे अध्यक्ष आनंद पुंडलिक भाईडकर व सौ. अल्पा आनंद भाईडकर तसेच उपमुखत्यार नंदकिशोर विश्वनाथ शिरगावकर यांच्या यजमानपदाखाली यंदा नव्याने आणण्यात आलेल्या चांदिच्या उत्सवमूर्तीची पूजा व पुरोहितांच्या यजमानपदाखाली श्री देव बोडगेश्वराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन उत्साहात पार पडला. दुपारी देवस्थानचे पुरोहित शाम गांवकर यांनी गाऱहाणे घालून व तद्नंतर आरती होऊन तीथप्रसाद झाला. रात्री 8.30 वा. ॐ सत्य साई सेवा मंडळ म्हापसातर्फे प्रार्थना व भजन झाल्यानंतर पौराणिक नाटक ‘गंगाजल’ सादर करण्यात आले.
तसेच दि. 9 रोजी दु. 12 वा. श्री देव बोडगेश्वराचा 85 वा महान जत्रोत्सव होणार असून सायं. 6 वा. भजन, रात्री 12 वा. पारंपरिक पौराणिक दशावतारी नाटक ‘भद्रकाली महिमा’ सादर होईल.
दि. 10 रोजी सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 5 वा. मोहन पोळे व साथींचे भजन, रात्री 11 वा. श्रींची आरती व प्रार्थना होऊन उत्सवाची सांगता होईल. दि. 11 रोजी सकाळी 10 वा. पिकअप -ड्रायव्हर असोसिएशन म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 5 वा. भजन, दि. 12 रोजी सकाळी 10 वा. म्हापशातील मासळी विक्रेत्या महिलांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 5 वा. भजन. दि. 13 रोजी सकाळी 10 वा. रिक्षा-ड्रायव्हर असोसिएशन म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 5 वा. भजन, दि. 14 रोजी सकाळी 10 वा. म्हापसा नगरपालिकेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 5 वा. भजन. दि. 15 रोजी सकाळी 10 वा. म्हापसा व्हेजिटेबल व्हेंडर्सतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 5 वा. भजनाचा कार्यक्रम होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.