प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी फोटोला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी बोलताना शुभम शेळके म्हणाले, मराठी शाळा या मराठी भाषेचा पाया आहेत. शैक्षणिक उपक्रमांतर्गत मातृभाषेतून शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून प्रोत्साहन देण्याचे काम युवा समिती करत असल्याचे त्यांनी सांगितले. अंकुश केसरकर यांनी बेळगावमध्ये होणाऱया भाषिक गळचेपीविरोधात विचार मांडले.
यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, सूरज कुडुचकर, सौरभ जोशी, प्रवीण रेडेकर, साईनाथ शिरोडकर, विनायक कावळे, संतोष कृष्णाचे, जोतिबा पाटील, अजय सुतार, प्रतीक पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.