रंजन राजू मरवे, वर्षा विनोद आजरेकर, किरण राधाकृष्ण आजगावकर,गीता हलगेकर यांची निवड
बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी असंख्य उमेदवार रिंगणात आहेत. म. ए. समितीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदारांनी आघाडी घेतली आहे. तसेच पंच मंडळी आणि गल्लीतील विविध मंडळांच्या पाठिंब्याच्या आधारे काही उमेदवारांना अधिकृत घोषित करण्यात येत आहे. वॉर्ड क्र. 39 मधील उमेदवार रंजन राजू मरवे, वॉर्ड क्र. 49 मधून निवडणूक लढवित असलेल्या माजी नगरसेविका वर्षा आजरेकर यांच्या बाजूने जनतेचा कल वाढला आहे. वॉर्ड क्र. 54 हा महिलांसाठी राखीव असल्याने किरण राधाकृष्ण आजगावकर यांना भरपूर पाठिंबा मिळत आहे. तसेच वॉर्ड क्र. 50 मधून गीता मनोहर हलगेकर यांना विविध मंडळांचा पाठिंबा वाढला आहे. त्यामुळे रंजन राजू मरवे, वर्षा आजरेकर आणि किरण राधाकृष्ण आजगावकर,गीता हलगेकर यांना म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येत असल्याचे शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी कळविले आहे. या वॉर्डमधील मतदारांनी या उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन किरण गावडे यांनी केले आहे.