प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर कोरे गल्ली येथील नेसरीकर कुटुंबीयांच्यावतीने म. ए. समितीच्या आयसोलेशन सेंटरला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. प्रभाकर, सुधीर, शिवाजी व प्रताप या नेसरीकर बंधुंनी आपली आई कै. मालतीबाई महादेव नेसरीकर यांच्या स्मरणार्थ 25 हजारांची देणगी दिली आहे.
म. ए. समितीने कोरोना काळात लोकसहभागातून सुरू केलेले आयसोलेशन सेंटर हे सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. लोकांच्या मदतीतून हे सेंटर उभे असल्यामुळे याला सर्वांनी आर्थिक मदत करणे आवश्यक असल्याचे सुधीर नेसरीकर यांनी सांगितले. समितीचे कार्यकर्ते दत्ता जाधव, महादेव पाटील, सागर पाटील, माजी महापौर महेश नाईक, माजी नगरसेवक मोहन चिगरे, सुनील बोकडे यांच्यासह इतरांकडे ही आर्थिक मदत देण्यात आली.