प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागामध्ये 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून पाळला जातो. त्या दिवशी सायकल फेरी काढण्यात येते. 1 नोव्हेंबर 2016 रोजीही सायकल फेरी काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी लाठीमार करुन म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविला होता. या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी तिसऱया न्यायालयामध्ये सुरू आहे. बुधवार दि. 13 जानेवारी रोजी कोरोनामुळे सुनावणी होणे अवघड असून कोणत्याही कार्यकर्त्यांनी न्यायालयाकडे येवू नये, असे आवाहन ऍड. महेश बिर्जे यांनी केले आहे.
शहापूर पोलिसांनी दत्ता येळ्ळूरकरसह 42 जणांवर गुन्हा नोंदविला होता. त्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मात्र कोणत्याही कार्यकर्त्यांने न्यायालयात येवू नये, असे कळविण्यात आले. याचबरोबर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पत्रके वाटले म्हणून मधु कणबर्गी यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या ही खटल्याची सुनावणी बुधवार दि. 13 रोजी आहे. मात्र त्यांनीही उपस्थित राहू नये, असे वकिलांनी कळविले आहे.