ऑनलाईन टीम/ मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर मुंबईचा राजा आणि लालबागचा मानाचा गणपती असणाऱ्या गणेश गल्लीच्या राजाची 22 फुटांची मूर्ती रद्द करून 3 फुटांची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचानिर्णय लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.
मागील अनेक वर्षांपासून मुंबईच्या राजाची 22 फुटांची मनमोहक मूर्ती असते. दरवर्षी रूपात बाप्पाचे दर्शन होते. हे मनमोहक रूप पहाण्यासाठी भाविक गर्दी करतात. यंदा गणेशभक्तांना मोठी मूर्ती पाहता येणार नाही आहे. पण तीन फुटांची आकर्षक मूर्ती असणार असून उत्सवाचा उत्साह कायम असणार आहे.
लालबाग भागातील अजून एका प्रसिद्ध चिंचपोकळी सार्वजनिक सार्वजनिक उत्सव मंडळाने देखील गणेश आगमन सोहळा रद्द करण्याचा आणि मंडपातच गणेश मुर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मूर्तीच्या उंचीबाबत शासन जो निर्णय घेईल त्यानुसार मूर्ती बनवण्यात येईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.